पुणे... विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार - जोड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
ना. स. फरांदे म्हणाले, मी १९६३ मध्ये मराठी विषयाची पदवी प्रथम श्रेणी घेऊन प्राप्त केली. त्यावेळी मराठी विषयासाठीचे पाचही पारितोषिक मला देण्यात आले होते. त्यात आज एक माजी विद्यार्थी म्हणून जीवनसाधना गौरव पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत आहे. कोणालाही न विचारता मी स्वत: हून राजकारणातून सेवानिवृत्त झालो. खुर्चीला चिटकून न राहता प्रत्येकाने वेळेनुसार सेवानिवृत्ती घेऊन तरूण पिढीला संधी दिली पाहिजे.
पुणे... विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार - जोड
ना. स. फरांदे म्हणाले, मी १९६३ मध्ये मराठी विषयाची पदवी प्रथम श्रेणी घेऊन प्राप्त केली. त्यावेळी मराठी विषयासाठीचे पाचही पारितोषिक मला देण्यात आले होते. त्यात आज एक माजी विद्यार्थी म्हणून जीवनसाधना गौरव पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होत आहे. कोणालाही न विचारता मी स्वत: हून राजकारणातून सेवानिवृत्त झालो. खुर्चीला चिटकून न राहता प्रत्येकाने वेळेनुसार सेवानिवृत्ती घेऊन तरूण पिढीला संधी दिली पाहिजे.संचेती म्हणाले, सर्व हिरे ग्रामीण भागात आहेत, या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले तर विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये येऊ शकेल.त्यासाठी प्राध्यापक व प्राचार्यांनी मोठे योगदान देण्याची अवश्यकता आहे. खेडे सुधारले पाहिजे, असे म्हणतो आणि आपण शहराकडे जातो. मात्र,यात बदल झाला पाहिजे.डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव स्वीकारल्यानंतर वंचितांना त्यांचा हक्क मिळावा. त्यासाठी माझ्या लेखनाला आणि शब्दाला ताकद यावी, असा माझा प्रयत्न राहील. तसेच ग्रामीण व उपेक्षित भागातील लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आवश्यक गोष्टी माझ्या लेखनीतून याव्यात असा यापुढे प्रयत्न करणार आहे.कुलगुरू डॉ. गाडे यांनी विद्यापीठातर्फे राबविल्या जात असलेल्या क्रेडीट सिस्टीम, स्किल डेव्हलपमेंट आणि इक्विपमंेट फॅसिलिटी सेंटर विषयी माहिती दिली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिवसेंदिवस विद्यापीठाचा गुणात्मक व संख्यात्मक विसात होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. तर डॉ. नरेंद्र कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले.---