शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-पिंपरीच्या घोळाने स्मार्ट सिटीची यादी लांबली

By admin | Updated: August 11, 2015 23:45 IST

पुणे : शहरांमध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेत राज्यशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकत्रित समावेश केल्याने केंद्र शासनाचीही अडचण झाली आहे. या दोन्ही शहरांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने देशातील इतर 100 शहरांच्या यादीची निवड प्रक्रीया रखडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या योजनेत पुण्याचा आणि पिंपरीचा समावेश वेगळी शहरे म्हणूनच होण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनीही स्पष्ट केले.

पुणे : शहरांमध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेत राज्यशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकत्रित समावेश केल्याने केंद्र शासनाचीही अडचण झाली आहे. या दोन्ही शहरांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने देशातील इतर 100 शहरांच्या यादीची निवड प्रक्रीया रखडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या योजनेत पुण्याचा आणि पिंपरीचा समावेश वेगळी शहरे म्हणूनच होण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनीही स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शहरांची निवड करताना केंद्र सरकारने राज्याला दहा शहरांची निवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दोन्ही शहरांची काही प्रमुख कार्यालये तसेच समस्या एकसारख्या असल्याचे कारण पुढे करीत शासनाने ही दोन्ही शहरे एकत्र करून राज्यातील अकरा शहरांची शिफारस करण्याचा घाट घातला आहे. मात्र, अशा प्रकारे शहरे एकत्र करणे केंद्रशासनाच्या निकषातच बसत नसल्याने केंद्राला अद्याप अंतिम 100 शहरांची निवड करणे शक्य झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मागील आठवडयातच ही यादी जाहीर होणे अपेक्षीत असतानाही, अद्याप ती अंतिम करता आलेली नाही. एक शहर कमी केल्यानंतरच ही यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

==========