शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या मुळावर उठला पुणे महानगर पालिकेचा कचरा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

प्लॉस्टिक कचरा : आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

प्लॉस्टिक कचरा : आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा


घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये आज दि़ १४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २५ गाडयांनी कचरा आणून टाकला़ या कचर्‍यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे येथील पर्यावरणाला, जनावरांना धोका पोहचणार आहे़ हा कचरा महानगर पालिकेने तात्काळ उचलून घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगरपालिके बाहेर तीव्र आंदोलन करतील असा इशारा पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे यांनी दिला आहे़
गोहे बुद्रूकची उभेवाडी उंच डोंगरावर वसलेली छोटीशी वस्ती आहे़ पुण्यापासून १०० किलोमीटर अंतर आहे़ या ठिकाणी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास सलग २५ ते ३० गाडया आल्या़ येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता प्लास्टिक व खाणीने भरलेले ढिग त्यांना दिसले़
ग्रामस्थांनी चौकशी केली असता, शेतीसाठी खत म्हणून महानगरपालिका कचरा देते. गोहे येथे रहाणार्‍या व पुणे महानगरपालिकेत कामाला असणार्‍या मोघाजी उभे यांनी खतासाठी हा कचरा टाकायला लावला आहे़ त्यांनी दाखविलेल्या जागेनुसार पुणे महानगरपालिकेच्या गाडयांनी येथे कचरा खाली केला़ मोघाजी उभे महानगरपलिकेत सॅनेटरी इन्स्पेक्टर असून दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेची गाडी येऊन पहाणी करून गेली होती, असे ग्रामस्थ सिताराम जोशी, रामचंद्र गेंगजे, वामन जोशी, इंदुबाई गेंगजे, किसन गेंगजे, सितराम गंेगजे, रमेश गेंगजे, दत्तात्रय गेंगजे यांनी सांगितले़
ग्रामपंचायतची परवानगी न घेता कोणालाही न विचारता हा कचरा पुणे महानगरपालिकेने टाकला आहे़ हा कचरा पुणे महानगरपालिकेने घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगर पालिकेवर मोर्चा आणतील, हा कचरा महानगरपालिके बाहेर आणून टाकला जाईल, तसेच पुन्हा गाडया येऊ नयेत यासाठी येथे पोहचणार्‍या रस्त्याला रात्री दगडी लावून ठेवल्या जातील व एक गाडी देखील जाग्यावर येऊ देणार नसल्याचे उपसभापती सुभाष तळपे यांनी सांगितले़
प्लॉस्टिकचा कचरा
या कचर्‍यातून खत कसे होऊ शकते हे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी येऊन दाखवावे़ हे प्लास्टिक जनावर्‍यांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतील़ हा कचरा रानात पसरले, प्लास्टिकमुळे झाडे उगवणार नाहीत, पर्यावरणाचा र्‍हास होईल़ शहरीकरणामध्ये आमच्या आदिवासींचा बळी घेऊ नका, काबड कष्ट करून आदिवासी शेतकरी जगतात, मानव निमित्त आपत्ती आमच्यावर नको, खाजगी जागेत जरी कोणी कचरा टाकत असले तरी आम्ही कचरा टाकू देणार नाही़ पुन्हा महानगरपालिकेची माणसे व गाडया येथे आल्या तर त्यांनी परत नीट जाऊ देणार नाही, असे सिताराम जोशी यांनी सांगितले़
तसेच याबाबत आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, या कृतीमुळे ग्रामस्थांमध्येही संताप पसरला आहे़ पुणे महानगरपालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महानगरपालिकेने त्वरीत घेऊन जावा व यापुढे महानगरपालिकेंनी आदिवासी पट्टयात कुठेही कचरा टाके नये अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले़
़़़़़़़़़़़़़़़
140202015़हीवक़02 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पहाताना उपसभापती सुभाष तळपे व ग्रामस्थ
140202015़हीवक़03 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पहाताना उपसभापती सुभाष तळपे, सिताराम जोशी व ग्रामस्थ
140202015़हीवक़04 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा
140202015़हीवक़05 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये डांेगराच्या पठारावर पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २५ गाडयांनी आणून टाकलेला कचरा
छाया -निलेश काण्णव