शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस भाग १

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस

नागपुरातून लवकरच पुणे, अमृतसर एक्स्प्रेस
नितीन गडकरींची माहिती : नागपूर-रिवा एक्स्प्रेसला हिरवी झेंडी
नागपूर : नागपुरात राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची मागील अनेक दिवसांपासून रिवाला थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होती. रिवा एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे त्यांची मोठी सुविधा झाली असून लवकरच नागपुरातून अमृतसर आणि पुण्यासाठी रेल्वेगाडी सुरूकरण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नागपूर-रिवा एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या गाडीचा शुभारंभ केला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अविनाश पांडे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, नागपुरात घरेलू कामकाज करणारे रिवाचे अनेक नागरिक राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी रिवा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून उत्तर भारतीय मोर्चाने केली होती. ही गाडी सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. नागपूरकर जनतेसाठी नव्या रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी २.५० वाजता हिरवी झेंडी दाखवून त्यांनी नागपूर-रिवा एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव, व्ही.पी. डहाट, स्टेशन व्यवस्थापक संजयकुमार दाश आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
..............
चंद्रपूर, गडचिरोलीत रेल्वेचे जाळे
चंद्रपूर आणि गडचिरोली हा मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी या भागात रेल्वेचे जाळे पसरविण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यासाठी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
..........