शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारमुळे जनता आर्थिक संकटात

By admin | Updated: November 13, 2016 03:27 IST

नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन करावा लागत आहे. सामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत.हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने गांभीर्याने विचार केलाच नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी शनिवारी केली. ते म्हणाले की, अत्यंत घाईघाईत नोटा बंद करण्यात आल्या. आता काळा पैसा अन्य स्वरूपात रूपांतरित केला जात आहे. नोटा बंदीचा निर्णय हा नरेंद्र मोदी यांचा आणखी एक ‘निवडणूक जुमला’ आहे. नोटांवर बंदी घातल्यानंतर देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोक पैशांअभावी त्रासले आहेत. अशा वेळी पंतप्रधानांनी देशात असायला हवे होते. मात्र ते जपानला निघून गेले आहेत. कपिल सिबल म्हणाले की, सरकारमुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. रोख रक्कम मिळण्यासाठी बँका आणि एटीएम केंद्रांबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. खाते माझे आहे, पैसा माझा आहे, मग मी कित्येक तासन्तास रांगेत का उभे राहायचे? मात्र मोदी सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. मी सामान्य माणूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत करीत असतात. ते काही लोकांसारखे रांगेत उभे राहिलेले नाहीत. त्यांना तसे करण्याची वेळही येत नाही. खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची असते, हे त्यांना माहितीच नाही. पीठ, डाळी आणि साखर यांची किंमत काय आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे लोकांच्या हालाची या सरकारला कल्पनाच नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सामान्य नागरिकांसोबत रांगेत उभे राहून एका बँकेतून नोटा बदलून घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपिल सिबल यांची सरकारवरील टीका आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)