विद्यार्थ्यांची मातृसुरक्षेवर जनजागृती
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
पुणे : आजही आपल्या देशात दर लाखात १४९ माता प्रसूतीदरम्यान दगावतात. मागील वर्षी ४९ महिलांचा प्रसूतीदरम्यान पुण्यात मृत्यू झाला. याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी मातृसुरक्षा दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुकाराम पादुका चौकात पालखी मार्गावर जनजागृती अभियान राबविले.
विद्यार्थ्यांची मातृसुरक्षेवर जनजागृती
पुणे : आजही आपल्या देशात दर लाखात १४९ माता प्रसूतीदरम्यान दगावतात. मागील वर्षी ४९ महिलांचा प्रसूतीदरम्यान पुण्यात मृत्यू झाला. याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी मातृसुरक्षा दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुकाराम पादुका चौकात पालखी मार्गावर जनजागृती अभियान राबविले. प्रसुतीपूर्व तपासणी करा, हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर नियमित तपासा, घरात होणारीप्रसुती टाळा, कळा आल्याबरोबर दवाखान्यात जा, प्रसुतीनंतर घरात स्वच्छता ठेवा, घर निजंर्तुकीकरण करा, बाळंतपणासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सची मदत घ्या अशा घोषणा देत, फलक प्रदर्शित करण्यात आले. आपल्या सुना-लेकींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मातृसुरक्षा महत्वाची असल्याचा या अभियानातून संदेश देण्यात आला. मातृसुरक्षेचा संदेश देणारी रांगोळी पालखी मार्गावर काढण्यात आली होती. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या लीला माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील देशमुख, शशिकांत शुक्ला यांनी संयोजन केले.------------फोटो - एमराजानंद - १० फर्गुसनफोटोओळ - फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालखी मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून मातृसुरक्षेचा संदेश दिला.-----------