चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्ने) विशेष व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण यानाच्या उड्डाणप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. इस्ने उद्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात चार वेगवेगळ्या देशांचे पाच उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.
प्रक्षेपण यानाच्या उड्डाणासाठी 49 तासांची उलटगणती सुरू झाली आहे, असे इस्नेने म्हटले आहे.
पीएसएलव्ही सी-23 चे उद्या, सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी उड्डाण होणार आहे. अंदाजे 2क् मिनिटांनंतर इस्नेचा ‘वर्कहॉर्स’ पीएसएलव्ही पाच उपग्रहांना एकेक करून कक्षेत सोडणार आहे. पीएसएलव्हीद्वारे पाच उपग्रह अंतराळात पाठवले जाणार आहेत. यात फ्रान्सचा स्पॉट-7 हा मुख्य उपग्रह आहे. या व्यतिरिक्त कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर या तीन देशांचे चार उपग्रह पीएसएलव्ही सी-23 द्वारे अंतराळात पाठवले जाणार आहेत. (वृत्तसंस्था)