शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगावर केमोथेरपीच्या गरजेचा निर्णयाची चाचणी सिद्ध

By admin | Updated: May 28, 2015 01:20 IST

स्तनाचा कर्करोग झालेल्यांना केमोथेरपीच्या क्लेशकारक उपचाराची खरोखर गरज आहे काय, हे निश्चित करू शकणारी चाचणी एका भारतीय कंपनीने विकसित केली आहे.

नवी दिल्ली : स्तनाचा कर्करोग झालेल्यांना केमोथेरपीच्या क्लेशकारक उपचाराची खरोखर गरज आहे काय, हे निश्चित करू शकणारी चाचणी एका भारतीय कंपनीने विकसित केली आहे. भारतासह संपूर्ण जगात स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी महिलांसाठी दिलासादायक वरदान ठरणार आहे. ही चाचणी जनुकीय परीक्षणाची असून कर्करोग झालेल्या महिलांना केमोथेरपी घेण्याची गरज आहे काय? केमोथेरपी टाळता येईल काय? याची माहिती देईल. मैमाप्रिंट नावाची ही चाचणी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांना पुन्हा कर्करोग होण्याचा धोका आहे किंवा नाही याचा आढावाही घेईल. धोका नसलेल्या महिलांना केमो घेण्याची गरज राहणार नाही. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील सर्जिकल आॅन्कॉलॉजी विभागातील डॉ. आर. सरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार मैमाप्रिंट चाचणीत ७० जनुकांचे परीक्षण केले जाईल. कर्करोगाची जनुकीय फाईल पाहून संबंधित महिलेच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन उपचार करणे त्यातून शक्य होणार आहे. डॉ. सरीन यांच्या गाठीशी मुंबईतील अ‍ॅट्रॅक (पूर्वीची कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेच्या संचालकपदाचा अनुभव आहे. अ‍ॅट्रॅक हा भाभा अणुशक्ती केंद्राच्या अखत्यारीतील उपक्रम आहे. भारतात नव्या जनुकीय चाचण्या सुरु करण्याचे श्रेय लाभलेल्या आयलाईफ डिस्कव्हरीज या कंपनीचे प्रमुख आनंद गुप्ता यांच्या मते कर्करोगाच्या वेळीच निदानाइतकेच त्यावरील उपचाराचे यश कर्करोगाचा प्रकार जाणून घेण्यावर अवलंबून असते. स्तन कर्करोग होणाऱ्या सर्व महिला रुग्णांना पुन्हा कर्करोग होण्याचा धोका टाळण्यासाठी केमोथेरपी करण्याची गरज नसते. केमोथेरपी रुग्णाच्या जीवनावरही परिणाम करते. देशात सुरु होणारी नवी मैमाप्रिंट व ब्लूप्रिंट तंत्राची चाचणी कर्र्क रोग तज्ञांना रोगाची व्याप्ती, तीव्रता अणि रोग्याच्या जीवाला असलेला धोका समजण्यास मदत करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)