शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीसाठी अनुदान द्यावे, ठराव संमत

By admin | Updated: July 10, 2015 00:28 IST

स्थायी समिती सभा : कृत्रिम पावसाचाही प्रस्ताव

स्थायी समिती सभा : कृत्रिम पावसाचाही प्रस्तावनाशिक : जिल्‘ात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या हंगामात दुबार पेरणीचे संकट कायम असून, शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी आवश्यक ते बियाणे खरेदीसाठी शासनाने तत्काळ अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.स्थायी समितीची बैठक रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीत सदस्य प्रवीण जाधव यांनी जिल्‘ातील पावसाची टक्केवारी व दुबार पेरण्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. गोरख बोडके यांनी सभापती केदा अहेर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप केला. त्यावर कृषी विभागाने जिल्‘ात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केल्याचे केदा अहेर यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी जिल्‘ात सरासरीच्या १५ टक्के पाऊस झाल्याची तसेच ३४ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्याचे सांगितले. पावसाची आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप प्रवीण जाधव यांनी केला. तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास काय नियोजन केले आहे, याची विचारणा केली. त्यावर जिल्‘ात खरिपासाठी ७२ हजार बियाण्यांचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. पैकी ४९ हजार ८९१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा, तर ३३ हजार ८९३ बियाण्यांची विक्री झाली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास जिल्‘ात ३३ हजार ९६८ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता असल्याचे बोराडे यांनी सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी जिल्‘ात बियाण्यांची अवाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून, त्याबाबत कृषी विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, असे सांगितले. शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्‘ात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असून, आता शेतकर्‍यांना दुबार पेरण्यांसाठी पैसा नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणीसाठी बियाण्यांच्या खरेदीसाठी तत्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे, असा ठराव त्यांनी मांडला तो सर्वानुमते संमत करण्यात आला. बैठकीस सदस्य गोरख बोडके, प्रा. अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, प्रवीण जाधव आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)इन्फो..ग्रामपंचायतींना ई-टेंडरिंग नाहीचतीन लाखांच्या पुढील कामांना ई-टेंडरिंग निर्णय लागू असताना ग्रामपंचायतींना मात्र त्यांच्या अंतर्गत रस्त्यांची कामे व जनसुविधेच्या कामांसाठी १० व १५ लाखांपर्यंतची मर्यादा असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी दिली. तसेच यापुढे ५० लाखांच्या पुढील कोणत्याही खरेदीसाठी ई-टेंडरिंग राबविण्याचा नवीन शासन निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.