शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मदरसा, वेद पाठशाळांमध्ये शालेय क्रमिक शिक्षणही द्यावे

By admin | Updated: January 2, 2017 01:09 IST

मुस्लिमांच्या मदरशांमध्ये आणि हिंदुंच्या वेद पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य क्रमिक शालेय शिक्षणही दिले जावे

नवी दिल्ली : मुस्लिमांच्या मदरशांमध्ये आणि हिंदुंच्या वेद पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य क्रमिक शालेय शिक्षणही दिले जावे, अशी शिफारस राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाने केली आहे.अशी व्यवस्था केली की, मदरसा व पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही शालेय विद्यार्थी म्हणून गणले जावे, जेणेकरून शाळाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल, असेही आयोगाचे मत आहे.बालहक्कांचे रक्षण आणि संवर्धन यासाठी काम करणारी आयोग हीदेशातील सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या शिक्षणविषय केंद्रीय सल्लागार समितीच्या उपसमितीस सादर केलेल्या अहवालात आयोगाने ही शिफारस केली आहे. शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळविण्यासाठी काय करता येईल यावर विचार करून अहवाल देण्यास आयोगास सांगण्यात आले होते.आयोग म्हणतो की, मदरसा, वेद पाठशाळा यासारख्या अनौपचारिक संस्थांमध्ये व अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये जाणाऱ्या मुलांचाही मागोवा घेतला जावा. मदरसा व वेदपाठशाळांनाही त्या त्या राज्यांच्या शालेय शिक्षण मंडळांशी संलग्नता देण्यात यावी आणि तेथे धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य शालेय पाठ्यक्रमही शिकविला जावा.सन २०११ च्या जनगणनेनुसार शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या8.4 कोटी होती. आयोगाचे सदस्य प्रियांक कनूंगो यांच्या मते, जनगणनेतील या शाळाबाह्य मुलांच्या संख्येत मदरसा व वेद पाठशाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची गणना कलेली नाही. या दोन प्रकारच्या अनौपचारिक शिक्षणसंस्थाही विचारत घेतल्या तर शाळाबाह्य मुलांची संख्या सुमारे २.५ कोटींनी कमी भरेल.मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मदरसा मंडळे आहेत. तेथील सर्व मदरशांना या मंडळाची संलग्नता असून, तेथे धार्मिक शिक्षणाखेरीज शालेय पाठ्यक्रमातील मूलभूत विषयही शिकवले जातात. अशा मुलांना गणित, विज्ञान व समाजशास्त्र हे विषयही शिकविले जात असल्याने, तेथील मुलांना शाळाबाह्य म्हणता येणार नाही, असेही कनूंगो म्हणाले.