शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

तामिळनाडूत निषेध, धरणे

By admin | Updated: January 19, 2017 04:55 IST

जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्याच्या निषेधार्थ तामिळनाडूत अनेक ठिकाणी शांततापूर्ण निषेध आणि धरणे सुरु आहेत.

चेन्नई : जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्याच्या निषेधार्थ तामिळनाडूत अनेक ठिकाणी शांततापूर्ण निषेध आणि धरणे सुरु आहेत. चेन्नई, कोयम्बतूरसह अनेक भागात हे आंदोलन होत आहे. आंदोलकांना समर्थन वाढत आहे.तामिळनाडूत नमक्कल येथे वकीलांच्या संघटनेने कामकाजावर बहिष्कार टाकला. चेन्नईत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करुन राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मरिना बीचवर हजारो लोक जमले असले तरी आंदोलन अतिशय शांततापूर्ण वातावरणात सुरु आहे. कोणत्याही राजकीय पक्षांचा या आंदोलनात हस्तक्षेप नाही. कारण, येथे आलेल्या अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या काही नेत्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अलांगनाल्लूर येथे हजारो तरुणांनी आंदोलन केले. हे आंदोलन रात्रीही सुरुच होते. अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मोठ्या हॉलमध्ये या आंदोलकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दक्षिणेतील अभिनेते विजय, अभिनेते सूर्या, जी. व्ही. प्रकाश, गायक अरुणराजा कामराज आणि अन्य कलाकारांनीही या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. >सरकारने केली चर्चा राज्याचे मत्स्य पालन मंत्री डी. जयकुमार आणि अन्य एक मंत्री पांड्याराजन यांनी बुधवारी आंदोलकांशी चर्चा केली. यातून ठोस तोडगा निघू शकला नाही. तर, या प्रकरणी राष्ट्रपतींशी संपर्क करुन अध्यादेश काढण्याची मागणी करणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.