साम्रगी घेऊन आलेला ट्रक माघारी पाठविला एक्स्पोला विरोध : खणंगिणीत रविवारी सभा
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST
मडगाव : नाकेरी किटल येथील नियोजित डिफेन्स एक्स्पोची सामग्री घेऊन रविवारी आलेला एक ट्रक या एक्स्पोला विरोध करणार्या नागरिकांनी अडवून माघारी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ प्रजेचो आवाजचे अध्यक्ष प्रेसी फर्नांडिस यांनी रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डिफेन्स एक्स्पोची सामग्री घेऊन एक ट्रक नियोजित जागेवर जात असता घटनास्थळी जमा झालेले ...
साम्रगी घेऊन आलेला ट्रक माघारी पाठविला एक्स्पोला विरोध : खणंगिणीत रविवारी सभा
मडगाव : नाकेरी किटल येथील नियोजित डिफेन्स एक्स्पोची सामग्री घेऊन रविवारी आलेला एक ट्रक या एक्स्पोला विरोध करणार्या नागरिकांनी अडवून माघारी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ प्रजेचो आवाजचे अध्यक्ष प्रेसी फर्नांडिस यांनी रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डिफेन्स एक्स्पोची सामग्री घेऊन एक ट्रक नियोजित जागेवर जात असता घटनास्थळी जमा झालेले सुमारे दीडशे लोकांनी हा ट्रक अडवून माघारी पाठविला असे त्यानी सांगितले. दरम्यान एक्स्पोला विरोधासाठी रविवार (दि. ६) खणंगिणी येथे सायंकाळी साडेतीन वाजता जाहीर सभा असल्याचे त्यांनी सांगितले. एक्स्पोला आमचा विरोध कायम राहील असे ते म्हणाले. आतापर्यंत सरकारकडून या एक्स्पोसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती स्थानिकांना देण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)