शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जपानकडून घेणार संरक्षण तंत्रज्ञान

By admin | Updated: May 10, 2017 00:49 IST

भारत जपानसोबतचे लष्करी साहाय्य वाढवीत आहे. त्याचप्रमाणे जपानकडून संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात भारताला रस आहे,

टोकियो : भारत जपानसोबतचे लष्करी साहाय्य वाढवीत आहे. त्याचप्रमाणे जपानकडून संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात भारताला रस आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साह्याने देशांतर्गत शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांची निर्मिती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जेटली यांनी काल जपानचे संरक्षणमंत्री तोमोमी इनाडा यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत आणि जपान यांच्यातील लष्करी संबंध अत्यंत मजबूत आहेत. विभागीय शांतता आणि स्थैर्यासाठी दोन्ही देश रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी पाठपुरावा करतील.जेटली म्हणाले की, भारत आणि जपान यांच्यात नियमितपणे प्रशिक्षण आणि नौदल सराव होतो. याशिवाय दोन्ही देश इतरही अनेक पातळ्यांवर एकमेकांना सहकार्य करीत असतात. स्थानिक पातळीवर संरक्षण उपकरणे निर्माण करण्यासाठी जपानी तंत्रज्ञान मिळविण्याचा भारताचा मानस आहे. जपानकडे अनेक प्रकारचे लष्करी तंत्रज्ञान आहे. भारताला त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. कारण आम्ही भारतात स्थानिक पातळीवर लष्करी उपकरणे बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. (वृत्तसंस्था)भारत आणि जपान व्यवसाय-ते-व्यवसाय या पातळीवर सहकार्य करार करण्याची शक्यता तपासून पाहत आहेत. जपानी तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत दोन पातळ्यांवर विचार करीत आहे. हे तंत्रज्ञान जपानकडून विकत घेणे हा एक पर्याय आहे, तसेच जपानचे तंत्रज्ञान वापरून भारतात युद्ध साहित्याची निर्मिती करणे हा दुसरा पर्याय आहे. - अरुण जेटली