शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग बोगद्यानजीक दोन भूमिगत मार्ग ंमहापालिकेचा प्रस्ताव: रेल्वे प्रशासनाची मान्यता, पावणेचार कोटी भरावे लागणार

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.

जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.
महापौर नितीन लढढा, आयुक्त जीवन सोनवणे व मनपातील इतर पदाधिकार्‍यांनी सोमवारी बजरंग बोगदा परिसरात भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली.
लाखो लोकांच्या रहदारीचा खडतर मार्ग
बजरंग बोगदा हा वाहतुकीसाठी नाही मात्र शहराकडे येण्यासाठी जवळचा व सुरक्षित म्हणून त्याचा वापर केला जात असतो. पिंप्राळा रेल्वे गेट या ठिकाणचा मार्ग पिंप्राळा, खोटेनगर, निमखेडी, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भिकमचंद जैन नगर या भागातील नागरिक वाहतुकीसाठी वापरत असतात. या व्यतिरिक्त बजरंग सांडपाण्याचा बोगदा या परिसरातील लोखा नागरिक सोयीचा मार्ग म्हणून वापरतात. त्याखालून दुचाकी वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. रिक्षा, मोठ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेट हाच पर्याय आहे.
दरमहा लाखो वाहनांची ये-जा
एका पाहणीच्या अहवालानुसार पिंप्राळा रेल्वे गेटवरून वाहतूक होणार्‍या वाहनांची संख्या एक ते सव्वा लाख दरमहा आहे. हे रेल्वे गेट रेल्वे स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे हे गेट बर्‍याच वेळेस बंदच असते. नजीकच रेल्वे गुड्स यार्ड आहे. या यार्डवर शेकडो ट्रक दिवसभरात येत जात असतात. गेट बंद असल्यास या भागात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे दृश्य नेहमी पहायला मिळते. रेल्वे गेटपासून रेल्वेस समांतर रोड हा गणेश कॉलनी भागाकडे जातो याच रोडवर बजरंग सांडपाण्याचा बोगदा आहे. रेल्वे गेट बंद असल्यास लहान, लहान दुचाकी चालक वळतात ते बजरंग बोगद्याकडे. या बोगद्याची निर्मिती ही सांडपाणी वाहून जाण्यासाठी रेल्वेने केली होती मात्र आता वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने त्याचा वापर वाहतुकीसाठी होतो.