शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

४९ मालमत्तांच्या विक्रीचा प्रस्ताव बीएचआर पतसंस्था : स्वमालकीच्या ७० वाहनांचा लावला शोध

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) पतसंस्थेचा अवसायकांनी पदभार घेतल्यानंतर कामाला गती आली आहे. संस्थेच्या मालकीच्या ४९ मालमत्ता व दुचाकी व चारचाकी अशा ७० वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी या मालमत्तांची व वाहनांची विक्री करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करणे सुरूआहे.
बीएचआर पतसंस्थेच्या नियमित कामकाजासोबतच अवसायक जितेंद्र कंडारे यांनी लेखापरीक्षणावर भर दिला आहे.
१० मालमत्तांचे उतारे नियमित
बीएचआर संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या मालकीच्या आतापर्यंत ४९ मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी १० मालमत्तांचे खातेउतारे हे नियमित आढळून आले आहे. काही मालमत्ता करार तत्वावर आहेत तर काही मालमत्तांच्या संदर्भात वाद सुरूआहेत.

६० वाहनांची मालकी
मालमत्तेसोबतच संस्थेने आपल्या मालकीच्या वाहनांचादेखील शोध सुरू केला आहे. त्यात ५० दुचाकी आणि १० चारचाकी वाहने आढळून आले आहेत. संस्थेकडून या वाहनांची आर.टी.ओ.कार्यालयातील नोंद तसेच कागदपत्रांचा शोध घेणे सुरू आहे. या वाहनांच्या लिलावाचा प्रस्तावदेखील संस्थेतर्फे तयार करणे सुरू आहे.

सहकार आयुक्तांच्या परवानगीसाठी पाठविणार प्रस्ताव
संस्थेच्या मिळून आलेल्या मालमत्ता तसेच जप्त वाहनांच्या लिलावाचा एकत्रित प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो मंजुरीसाठी सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लिलावप्रक्रिया पूर्ण करून त्यातून आलेल्या रकमेचे ठेवीदारांना वाटप करण्यात येणार असल्याचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले.

कर्जदारांची वर्दळ वाढली
कर्ज घेऊन थकबाकी न भरणार्‍या २७०० कर्जदार व जामीनदारांना बीएचआर पतसंस्थेने नोटीस काढल्या आहेत. त्यानंतर कर्जदारांनी थकित रक्कम भरण्यासाठी तसेच कर्जाची रक्कम व व्याज या रकमेत तडजोड करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात फेर्‍या मारणे सुरू केले आहे. या दरम्यान, दोन कर्जदारांनी आपण कर्जाची रक्कम भरली असताना आपल्याला थकबाकीदाराची नोटीस मिळाल्याची तक्रार संस्थेकडे केली आहे. त्यानुसार संस्थेने त्यांना कर्जाची रक्कम भरल्याच्या पावत्या मागविल्या आहेत.