शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

४९ मालमत्तांच्या विक्रीचा प्रस्ताव बीएचआर पतसंस्था : स्वमालकीच्या ७० वाहनांचा लावला शोध

By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) पतसंस्थेचा अवसायकांनी पदभार घेतल्यानंतर कामाला गती आली आहे. संस्थेच्या मालकीच्या ४९ मालमत्ता व दुचाकी व चारचाकी अशा ७० वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी या मालमत्तांची व वाहनांची विक्री करण्याबाबतचा प्रस्ताव करणे सुरू आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच.आर.) पतसंस्थेचा अवसायकांनी पदभार घेतल्यानंतर कामाला गती आली आहे. संस्थेच्या मालकीच्या ४९ मालमत्ता व दुचाकी व चारचाकी अशा ७० वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी या मालमत्तांची व वाहनांची विक्री करण्याबाबतचा प्रस्ताव करणे सुरू आहे.
बीएचआर पतसंस्थेच्या नियमित कामकाजासोबतच अवसायक जितेंद्र कंडारे यांनी लेखापरीक्षणावर भर दिला आहे.
१० मालमत्तांचे उतारे नियमित
बीएचआर संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या मालकीच्या आतापर्यंत ४९ मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी १० मालमत्तांचे खातेउतारे हे नियमित आढळून आले आहे. काही मालमत्ता करार तत्वावर आहेत तर काही मालमत्तांच्या संदर्भात वाद सुरू आहेत.

६० वाहनांची मालकी
मालमत्तेसोबतच संस्थेने आपल्या मालकीच्या वाहनांचादेखील शोध सुरू केला आहे. त्यात ५० दुचाकी आणि १० चारचाकी वाहने आढळून आले आहेत. संस्थेकडून या वाहनांची आर.टी.ओ.कार्यालयातील नोंद तसेच कागदपत्रांचा शोध घेणे सुरू आहे. या वाहनांच्या लिलावाचा प्रस्तावदेखील संस्थेतर्फे तयार करणे सुरू आहे.

सहकार आयुक्तांच्या परवानगीसाठी पाठविणार प्रस्ताव
संस्थेच्या मिळून आलेल्या मालमत्ता तसेच जप्त वाहनांच्या लिलावाचा एकत्रित प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो मंजुरीसाठी सहकार आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लिलावप्रक्रिया पूर्ण करून त्यातून आलेल्या रकमेची ठेवीदारांना वाटप करण्यात येणार असल्याचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले.

कर्जदारांची वर्दळ वाढली
कर्ज घेऊन थकबाकी न भरणार्‍या २७०० कर्जदार व जामीनदारांना बीएचआर पतसंस्थेने नोटीस काढल्या आहेत. त्यानंतर कर्जदारांनी थकित रक्कम भरण्यासाठी तसेच कर्जाची रक्कम व व्याज या रकमेत तडजोड करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात फेर्‍या मारणे सुरू केले आहे. या दरम्यान, दोन कर्जदारांनी आपण कर्जाची रक्कम भरली असताना आपल्याला थकबाकीदाराची नोटीस मिळाल्याची तक्रार संस्थेकडे केली आहे. त्यानुसार संस्थेने त्यांना कर्जाची रक्कम भरल्याच्या पावत्या मागविल्या आहेत.