अनधिकृत गाळ्यांचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: December 3, 2015 00:36 IST
जळगाव : महापालिकेच्या जुने व नवीन सेंट्रल फुले मार्केटमधील टॉयलेटच्या जागेवर अनधिकृत उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव ९ डिसेंबरला होणार्या महासभेत सादर केला जाणार आहे. जुने फुले मार्केटमधील दीपक काबरा, वासुदेव गेही व सेंट्रल फुले मार्केटमधील वसंता चावरिया व किशोर मरसाळे व तसेच दिलीप लुंकड ...
अनधिकृत गाळ्यांचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव
जळगाव : महापालिकेच्या जुने व नवीन सेंट्रल फुले मार्केटमधील टॉयलेटच्या जागेवर अनधिकृत उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव ९ डिसेंबरला होणार्या महासभेत सादर केला जाणार आहे. जुने फुले मार्केटमधील दीपक काबरा, वासुदेव गेही व सेंट्रल फुले मार्केटमधील वसंता चावरिया व किशोर मरसाळे व तसेच दिलीप लुंकड यांनी अनधिकृत गाळे उभारले आहे. यासंदर्भात महासभेत सदस्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. आयुक्त अभिप्राय देणार १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत २४ नोव्हेंबरला झालेल्या महासभेत राज्य शासनाने दिलेल्या निर्णयावर आयुक्तांनी सविस्तर अभिप्राय सादर करावा, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार महासभेत त्यांचा अभिप्रायही सादर करणार आहेत.