शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्याच्या देशवापसीसाठी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव

By admin | Updated: February 10, 2017 08:53 IST

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याची देशवापसी करण्यासाठी आता परराष्ट्र मंत्रालयाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. 
(कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा)
 
भारतात खटला चालवण्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी गुरुवारी सांगितले की, माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. तसंच यावेळी ब्रिटिश सरकारकडून माल्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटिश सरकारचे आधीचे रेकॉर्ड पाहता, या प्रयत्नात तरी यश येईल की नाही? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.  
(माल्याच्या पत्रांवरून भाजपाने मनमोहन, चिदंबरम यांना घेरले)
 
विजय माल्यावरुन वारंवार केंद्र सरकारला धारेवर धरणा-या विरोधकांनाही 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खडेबोलदेखील सुनावले आहेत. 'एनडीए सरकारने आपल्या कार्यकाळात माल्याला एकाही पैशांचा फायदा होऊ दिला नाही. तत्कालीन युपीए सरकारच्या कार्यकाळात माल्याला कर्ज मिळाले आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला जास्त अवधीही देण्यात आला. युपीए सरकारच्या कर्माची शिक्षा आम्ही भोगत आहोत'. अशा शब्दांत जेटली यांनी युपीए सरकारवर हल्लाबोल केला.