साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे सादर होणार
By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST
जळगाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १४ मार्च २०१६ रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे.
साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे सादर होणार
जळगाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १४ मार्च २०१६ रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे.न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयात सोमवारी सिमी खटल्याचे कामकाज झाले. सिमी प्रकरणाशी संबंधित असणारी सेशन केस क्रमांक १२६/२००२ निकाल यापूर्वी लागला आहे. या खटल्यात ज्या साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी वकिलांकडून करण्यात आली आहे; त्यांच्या जबानीच्या सही व शिक्क्यांच्या नकला १४ मार्चला न्यायालयात दाखल करून घेण्यात येणार आहेत. या खटल्यात सरकारपक्षातर्फे ॲड.टी.डी. पाटील तर आरोपींतर्फे ॲड.सुनील चौधरी व ॲड.ए.ए. शेख काम पाहत आहेत.