शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रियल इस्टेट विधेयक बेमुदत लांबणीवर

By admin | Updated: May 6, 2015 00:46 IST

स्थावर मालमत्ता व्यवसायावर नियमन आणण्यासंबंधी वादग्रस्त रियल इस्टेट विधेयक सरकारने मंगळवारी अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकले.

नवी दिल्ली : स्थावर मालमत्ता व्यवसायावर नियमन आणण्यासंबंधी वादग्रस्त रियल इस्टेट विधेयक सरकारने मंगळवारी अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकले. राज्यसभेत हे विधेयक सादर होताच विरोधकांनी एकजूट दाखवत ते निवड समितीकडे पाठविण्याची मागणी लावून धरली. या सभागृहात अल्पमतात असलेल्या सरकारवर ते तूर्तास थंडबस्त्यात ठेवण्याची नामुष्की ओढवली.रियल इस्टेट (सुधारणा) विधेयक मंजुरीसाठी सभागृहात सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी जोरदार विरोध दर्शविला. गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलनमंत्री वेंकय्या नायडू यांनी विविध पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतरच ते सभागृहात ठेवण्याचे आश्वासन दिले असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनीही त्यांना जोरदार समर्थन दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)------------सल्लामसलतीचे आश्वासनमी या विधेयकावर विविध पक्षांसोबत सल्लामसलत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. दरम्यानच्या काळात सुट्या आल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते सभागृहात सादर केले जाईल, अशी ग्वाही नायडू यांनी दिली. हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे की नाही यावर सभागृहाने १३ मेपूर्वी म्हणजे अधिवेशन संपण्याअगोदर विचार करावा, असे त्यांनी म्हणताच विरोधकांनी आक्षेप घेतल्याने नायडू यांनी आश्वासनाचा पुनरुच्चार करीत विषय संपविला.