व्हीएनआयटी नाग नदीवर प्रकल्प उभारणार
By admin | Updated: February 10, 2015 00:55 IST
नीरी चे सहकार्य : दूषित पाणी शुद्ध करणार
व्हीएनआयटी नाग नदीवर प्रकल्प उभारणार
नीरी चे सहकार्य : दूषित पाणी शुद्ध करणारनागपूर : नाग नदी स्वच्छता अभियानात सहभागी होत विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था (व्हीएनआयटी) नीरीच्या सहकार्याने दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. पाच लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. नदीतील दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर या पाण्याचा वापर बगीचा व दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे . त्यानंतर प्रक्रिया केलेले शिल्लक पाणी नदीत सोडले जाईल, अशी माहिती व्हीएनआयटी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी दिली. नदीतील पाणी शुद्ध करण्यासाठी आधी दूषित पाण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. यासाठी नदीपात्रात शक्य तितके शुद्ध पाणी सोडण्याची गरज आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर व्हीएनआयटी परिसरातील बगीचासाठी केला जाणार आहे. पाण्याचे महत्व विचारात घेता नदीतील दुषित पाणी शुद्ध करण्याचा विचार पुढे आला. संस्थेच्या परिसरात वसतीगृह, शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा वापर केला जातो. वापरानंतर सांडपाणी नालीत सोडण्यात येेते. या पाण्याचा पुनर्रवापर व्हावा, यातून हा प्रकल्प उभारण्याची कल्पना पुढे आली. या संदर्भात नीरी च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)