शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ संदर्भातल्या निर्णयांना 31 जुलै पर्यंत स्थगिती

By admin | Updated: April 19, 2016 16:21 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यावरील प्रस्तावित कठोर निर्बंध शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - वयाच्या 58व्या वर्षापर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढता येणार नाही, या नियमाला कडाडून विरोध झाल्यामुळे केंद्र सरकारने या नियमाच्या अमलबजावणीला 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. बेंगळूरमध्ये तर कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात काही बसगाड्यांनाही आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे. 

येत्या तीन महिन्यांत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत नवीन नियम स्थगित करण्यात आला असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. सरकारने नव्या घराच्या खरेदीसाठी, वैद्यकीय उपचारासाठी तसेच मुलांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी कर्मचा-यांना आता भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढता येईल, असे म्हटले होते. पीएफची रक्कम म्हतारपणाचा आधार असल्यामुळे ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम काढता येण्याची अट केंद्र सरकारने लागू केली होती. मात्र, यास तीव्र विरोध होत आहे.

पीएफ काढण्यासाठी जे नियम शिथिल करण्यात आले आहेत त्याचा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विविध विभागाच्या कर्मचा-यांनाही लाभ घेता येणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होईल. विविध कामगार संघटनांच्या सूचनांची दखल घेऊन कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी पीएफच्या नियमात बदल केले आहेत. 
 
ज्या तारखेपर्यंत पीएफ भरला आहे त्या तारखेपर्यंतची रक्कम व्याजासह कर्मचा-याला देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतल्याचे सरकारी पत्रकात म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यातील कामगार मंत्रालयाच्या निर्णयानुसार त्याला ५८ वर्षापर्यंत थांबावे लागणार होते. पीएफची रक्कम वृद्धत्वाचा आधार असल्याने केंद्र सरकारने वयाच्या ५८ व्या वर्षांपर्यंत पीएफची रक्कम काढण्यावर बंदी घातली होती. आता, संबंधित संघटनांशी चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते हे जुलैमध्येच स्पष्ट होणार आहे.