शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या आढाव्यासाठी ‘प्रगती’ कॉन्फरन्स कॉल

By admin | Updated: March 15, 2015 01:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र सरकारच्या सचिवांशी ‘कॉन्फरन्स कॉल’च्या माध्यमातून एकाच वेळी संवाद साधणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व राज्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढे दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र सरकारच्या सचिवांशी ‘कॉन्फरन्स कॉल’च्या माध्यमातून एकाच वेळी संवाद साधणार आहेत. अशी कॉन्फरन्स कॉलने होणारी पहिली बैठक येत्या २५ मार्च रोजी होणार आहे.पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी अलीकडेच केंद्र सरकारच्या सर्व सचिवांना आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना एक टिपण पाठवून या नव्या सुशासन योजनेचे स्वरूप आणि उद्देश त्यांना कळविला आहे. ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन’ या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांवरून या योजनेस ‘प्रगती’ असे संबोधण्यात येणार आहे.या कॉन्फरन्स कॉलला अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाची जोड दिलेली असेल. त्यामुळे पंतप्रधान जेव्हा एखाद्या योजनेचा अथवा कामाचा आढावा घेतील तेव्हा त्याविषयीची सर्व माहिती व त्यावेळपर्यंतच्या प्रगतीचा आलेख त्यांना केवळ एका ‘क्लिक’ने उपलब्ध होईल. नृपेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या टिपणामध्ये असे नमूद केले आहे की, पंतप्रधान कॉन्फरन्स कॉलवरून मुख्य सचिव व केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद साधतील तेव्हा ते अडचणींचे मुद्दे समजावून घेऊन त्यावर चर्चा करतील आणि त्या दूर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते निर्देशही देतील. पंतप्रधानांनी दिलेले हे निर्देश संबंधित विषय अंतिमत: हातावेगळा केला जाईपर्यंत वेळोवेळी आढावा घेऊन ‘फॉलो-अप’ करण्यासाठी यंत्रणेत कायम राहतील. या नव्या व्यवस्थेमागील हेतू स्पष्ट करताना नृपेंद्र मिश्रा लिहितात की, लोकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाण्यांचे निराकरण करणारी विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान आग्रही आहेत. तसेच सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रम आणि योजना वेळेत पूर्ण होऊन त्यांचे इच्छित लाभ जनतेला मिळावेत यासाठी त्यांच्या अंमलबजावणीवर निगराणीची सुयोग्य व्यवस्था असावी, यावरही पंतप्रधानांचा भर आहे. तसेच देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्यांच्या योजना वेळेत पूर्ण व्हायला केंद्रानेही हातभार लावायला हवा, असे त्यांचे मत आहे. ‘प्रगती’ कॉन्फरन्स कॉलमुळे स्वत: पंतप्रधानांच्या निगराणीने हे काम होऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)राजकीय पोटदुखीची शक्यतास्वत: पंतप्रधानांनी अशा प्रकारे मासिक आढावा घेणे सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गती देण्याच्या दृष्टीने चांगले असले तरी त्यामुळे केंद्र-राज्य संबंधांची दुखरी नस दाबली जाऊन काहींना राजकीय पोटदुखी होण्याचीही शक्यता आहे, असे मत एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर व्यक्त केले.