प्रज्ञा - खड्ड्यंामुळे रस्त्याची दुर्दशा
By admin | Updated: May 22, 2015 00:25 IST
बेल्हा : साकोरी फाटा ते साकोरी (ता. जुन्नर) गावापर्यंतच्या ३ किलोमीटर रस्त्याला मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
प्रज्ञा - खड्ड्यंामुळे रस्त्याची दुर्दशा
बेल्हा : साकोरी फाटा ते साकोरी (ता. जुन्नर) गावापर्यंतच्या ३ किलोमीटर रस्त्याला मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.साकोरी फाटा येथून साकोरी गावापर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. पाइपलाइन टाकण्यासाठी संपूर्ण रस्ताच खोदल्यामुळे वाहनचालकांची कसरत होत आहे. या रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांचे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अनेक दुचाकीस्वारही घसरून पडले आहेत. या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी नेहेरकर यांनी केली आहे.फोटो : साकोरी फाटा ते साकोरी (ता. जुन्नर) या रस्त्याला पडलेले खड्डे.