शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

१३ पालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित २४ जून ते १६ ऑगस्ट दरम्यान चालणार प्रक्रिया

By admin | Updated: June 17, 2016 23:08 IST

जळगाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्‍या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

जळगाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्‍या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
जिल्‘ातील भडगाव, वरणगाव, जामनेर या नगरपालिका वगळता १३ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधित संपत आहे. त्यानुसार या नगरपालिकांची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. २४ जुनपर्यंत मुख्याधिकारी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करतील. त्यानंतर २९ जुनपर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता देतील. जिल्हाधिकारी जुनपर्यंत सदस्य पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करतील. २ जुलै पर्यंत नगरपरिषद, नगरपालिका सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत मुख्याधिकारी काढतील. त्यानंतर ५ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग मार्गदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या आरक्षणाची रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती व सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ ते १४ जुलै दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. २७ जुलै पर्यंत प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होणार आहे. २ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबधित विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवतील. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. १६ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी प्रभाग निहाय एकुण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकसंख्या आरक्षणासह जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.