शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मनपात मोर्चा नितीन साहित्यानगरातील समस्या :बोअरिंगचे पाणी पिण्याच अयोग्य असल्याने हाल

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना घेराव घातला.

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना घेराव घातला.
यापूर्वीही स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यावेळी पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले होते. मात्र मजिप्राच्या अभियंत्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सध्याच्या पाईपलाईनवरून पुढे पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. तरीही तात्पुरती उपाययोजना म्हणून पाईपलाईन टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मध्ये असलेल्या शेतमालकाने विरोध दर्शविल्याने ते कामही बंद पडले.

पाण्याची तपासणी करणार
या परिसरात ज्या बोअरवेलवरून पाणी वापरले जात आहे. ते पिण्या योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणजे आहे. त्यामुळे मनपाने भूजल सर्वेक्षण विभागाला पत्र देऊन पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

जलकंुभाची गरज
सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.