शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी नाव नोंदणीसाठी पदवीधारकांना अडचणी

By admin | Updated: April 20, 2015 13:05 IST

पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

जळगाव : पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ नुक ताच पार पडला. या समारंभासाठी अनेक पदवीधारकांनी पाठ फिरविली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. त्यात ज्या पदवीधारकांना त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयांकडे पाठविले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच परीक्षा शुल्क भरताना पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे शुल्क आकारले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पाठविण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची आहे; असे महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांना सांगितले जात असल्यामुळे विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अडचण येत आहे. नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र अनिवार्य असताना अनेक विद्यार्थी त्यांचे पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात येत असल्याचे दिसत आहे. याबाबत परीक्षा नियंत्रक धनंजय गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. दहा दिवसांची मुदतवाढ मिळावीदरम्यान, पदवीधारकांच्या नाव नोंदणीसाठी विद्यापीठातर्फे २० एप्रिलपर्यंतच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अनेकांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातच पडून आहेत. यासंदर्भात महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर विद्यापीठाकडून अद्याप पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात आलेले नाही. विद्यापीठात चौकशी करा, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने विद्यापीठात येऊन पदवी प्रमाणपत्र काढावे लागत असून नाव नोंदणीसाठी दहा दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सिनेट सदस्य ॲड. अमित दुसाने यांनी केली आहे.