पुरस्कार.....
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
राज्याला केंद्र शासनाचा पुरस्कार
पुरस्कार.....
राज्याला केंद्र शासनाचा पुरस्कारनवी दिल्ली येथे गौरव : ऊर्जा निर्मिती क्षमतेत भरीव वाढ नागपूर : भारत सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत जागतिक स्तरावरील नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक परिषद व प्रदर्शन नवी दिल्ली येथे नुकतेच पार पडले. या परिषदेत ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये भरीव वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाने पुरस्कार प्रदान केला.परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विविध राज्यांचे ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री, ऊर्जा क्षेत्रातील विकासक व उत्पादक, राज्यस्तरीय मुलाधार संस्थांचे प्रतिनिधी तसेच देश-विदेशातील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. ऊर्जा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्याबद्दलचा सदर पुरस्कार केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार) मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारला. महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ३०८३ मेगावॅट एवढ्या क्षमतेच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत भर घातली आहे. राज्याच्या या भरीव कामगिरीची केंद्र शासनाने दखल घेत महाराष्ट्र राज्यास सदर पुरस्कार प्रदान केला आहे. (प्रतिनिधी)