शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

प्रियंकाला मोटी म्हणून चिडविले जात होते

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : वडिलांनी वाचला साक्षीत छळाचा पाढा

प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : वडिलांनी वाचला साक्षीत छळाचा पाढा
जळगाव: सतत मोटी म्हणून चिडविणे,अंथरुणावर मुद्दाम पाणी टाकणे, बंगाली असल्याने मराठी बोलण्याची सक्ती करणे अशा प्रकारे प्रियंका मुखर्जी हिचा छळ केला जात असल्याची साक्ष प्रियंका मुखर्जी हिचे वडील तथा फिर्यादी डॉ.नयन दिलीप मुखर्जी यांनी गुरुवारी न्यायालयात दिली.
गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिने २४ मे २०१४ रोजीच्या मध्यरात्री दीड वाजता महाविद्यालयाच्या वसतीगृहात आत्महत्या केली होती. याबाबत तिच्या सहकारी प्रियंका काबरा, प्रिया पवार व स्नेहल महाजन यांच्याविरुध्द नशिराबाद पोलीस स्टेशनला रॅगिंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. न्या.प्रीतीकुमार घुले यांच्या न्यायालयात या खटल्याला सुरुवात झाली. गुरुवारी प्रियंकाचे वडील नयन मुखर्जी यांनी घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. तिला होत असलेल्या त्रासाचा पाढाच त्यांनी वाचला. यावेळी त्यांनी प्रियंकाने लिहून ठेवलेली सुसाईड नोट ओळखली. ही नोट पाहून त्यांना रडू कोसळले. सरतपासणी घेतल्यानंतर बचाव पक्षाच्या विनंतीवरुन ३० ऑक्टोबर रोजी उलटतपासणी घेण्यात येणार आहे. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील यांनी, सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीकडून ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी काम पाहिले.
इन्फो...
एकुलती एक मुलगी
डॉ.नयन मुखर्जी यांना प्रियंका ही एकुलती एक मुलगी होती. तिच्या आत्महत्येनंतर मुखर्जी परिवाराने एक महिन्याचे बाळ दत्तक घेतले. नयन मुखर्जी तारखेसाठी जळगावात पोहचल्यावर तिकडे त्यांच्या पत्नीलाही रडू कोसळले. तर नयन यांना न्यायालयात रडू कोसळले. एकमेव व लाडाची मुलगी गेल्याच्या दु:खातून ते अजूनही सावरले नाहीत.