प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात अधिष्ठातांची साक्ष
By admin | Updated: February 22, 2016 23:56 IST
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात सोमवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नारायण सदाशिवराव आर्वीकर यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात आली.
प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात अधिष्ठातांची साक्ष
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात सोमवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नारायण सदाशिवराव आर्वीकर यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात आली.न्यायाधीश प्रीतीकुमार घुले यांच्या न्यायालयात या खटल्याचे काम सुरू आहे. सोमवारी अधिष्ठाता डॉ.नारायण आर्वीकर यांनी साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदरम्यान ते म्हणाले की, ज्या वेळी प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण घडले; तेव्हा ते वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. २५ मे २०१४ रोजी हे प्रकरण घडले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते मुलींच्या वसतिगृहात प्रियंका राहत असलेल्या खोलीत गेले होते. तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. घटनेच्या दुसर्या दिवशी पोलिसांनी तिची सुसाइड नोट आर्वीकर यांना दाखवली. त्यात आरोपी मुली त्रास देत असल्याने आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे प्रियंकाने नमूद केले होते. रॅगिंगविरोधी समितीचे अध्यक्ष असल्याने या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठवला होता. तो अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरुंनी कायम ठेवल्याचे त्यांनी साक्षीत सांगितले.साक्ष नोंदवल्यानंतर उलटतपासणीसाक्ष नोंदवल्यानंतर डॉ.नारायण आर्वीकर यांची आरोपींच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. रॅगिंगच्या चौकशीदरम्यान, आरोपी मुली प्रियंकाला त्रास देत असल्याचे कुणीही म्हटले नसल्याची बाब आर्वीकर यांनी उलटतपासणीत मान्य केली.या खटल्यात सरकारपक्षाकडून ॲड.केतन ढाके तर आरोपींकडून ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे काम पाहत आहेत.