शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी-स्मृती इराणींत वाक्युद्ध

By admin | Updated: May 27, 2015 23:47 IST

रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले.

रायबरेली/ मिदनापूर : रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची इराणींची इच्छा आहे. मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? असा खरमरीत सवाल प्रियंकांनी केला. यावर प्रश्न विचारण्याआधी प्रियंकांनी गृहपाठ(होमवर्क) करावा, अशा शब्दांत इराणींनी पलटवार केला.मंगळवारी गांधी-नेहरू घराण्याला लक्ष्य करणाऱ्या इराणींना बुधवारी रायबरेली दौऱ्यावर आलेल्या प्रियंकांनी सडेतोड उत्तर दिले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची स्मृती इराणींची इच्छा आहे. तर मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? येथील युवा अनेक अडचणींना तोंड देत आहेत. इराणी मनुष्यबळ विकास मंत्री आहे. मग त्या युवांच्या या समस्यांकडे का बघत नाहीत? असे सवाल प्रियंकांनी केले.प्रियंकांच्या या डिवचणाऱ्या प्रश्नांना इराणींनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था)मंगळवारी मी अमेठीत होते. त्यामुळे गांधी परिवाराकडून माझ्यावर टीका होणार, याची अपेक्षा मला होतीच. माझ्या अमेठी दौऱ्याने गांधी कुटुंबाच्याही अमेठीच्या फेऱ्या वाढतील, हे मी आधीही बोलले होते. आज मला त्याची प्रचिती येत आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.स्मृती यांनी अमेठी दौऱ्यावेळी सलोन गावात बोलताना, गांधी-नेहरू घराण्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आजोबा सांगून गेले, आजी सांगून गेल्या आता राहुलही आश्वासने देत आहेत. आतापर्यंत अमेठीच्या जनतेने खोटी आश्वासनेच पाहिली. मात्र आता अमेठीवासींना थेट विकास दिसेल, असे त्या म्हणाल्या.