शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं काम अर्थव्यवस्था सुधरण्याचं, कॉमेडी सर्कस चालवायचं नाही,  प्रियंका गांधींचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 20:23 IST

नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे. ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीचा उल्लेख करत पीयूष गोयल यांना टोला लगावताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारचे काम अर्थव्यवस्था चालवण्याचे आहे. कॉमेडी सर्कस चालवण्याचे नाही.  अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना पीयूष गोयल म्हणाले होते की, ''अभिजित बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीशी जवळीक असलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी न्याय योजनेला जोरदार पाठिंबा दिला होता. मात्र जनतेने त्या योजनेला नकार दिला होता.'' त्याला प्रत्युत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजपा नेत्यांना जे काम मिळाले आहे ते पूर्ण करण्याऐवजी ते इतरांनी मिळवलेले यश नाकारण्यात गुंतले आहेत. नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करून नोबेल पुरस्कार जिंकला. अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशा परिस्थितीत तुमचं काम अर्थव्यवस्था सावरण्याचं आहे, कॉमेडी सर्कस चालवण्याचं नाही.'' 

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने न्याय योजनेचा जोरात प्रचाक केला होता. गरीब कुटुंबांना अर्थसहाय्य देणारी ही योजना तयार करण्यासाठी काँग्रेसने अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची मदत घेतली होती. त्यावरून बॅनर्जींवर टीका करताना पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, बॅनर्जी यांनी ज्या योजनेचा प्रचार केला होता त्या योजनेला भारतीय जनतेने पूर्णपणे नाकारले.  

पीयूष गोयल यांनी नोबेल पुरस्कारविजेते अभिजित बॅनर्जी यांचं उपहासात्मक कौतुक करताना ते डाव्या विचारांचे अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते. अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. ते कुठल्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात, हे तुम्हाला माहितच असेल. ते डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाPriyanka Gandhiप्रियंका गांधीpiyush goyalपीयुष गोयलPoliticsराजकारण