शीलेश शर्मा - नवी दिल्ली
माजी विदेशमंत्री नटवरसिंग यांची काँग्रेसवरील नाराजी जगजाहीर असली तरी प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय बनल्यास त्या ‘गेम चेन्जर’ सिद्ध होतील असा दावा त्यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत केला आहे.
प्रियंका गांधी यांच्याकडे करिश्मा आहे. त्या लोकांचे म्हणणो ऐकून घेतात. त्यांच्यात उठबस करतात. राजकारणात लोकांशी कसे वागावे लागते याची त्यांना माहिती आहे. पण त्या राजकारणात सक्रिय होताच लोक चिखलफेक करतील.
पती रॉबर्ट वड्रा यांच्याबद्दल विचारण्यात येईल तेव्हा त्या काय उत्तर देणार? त्या काँग्रेसची धुरा सांभाळणार असतील तर राहुल गांधी काय करतील? असे सवालही नटवरसिंग यांनी उपस्थित केले.
मोदींना टक्कर सोपी नाही
च्मोदींना टक्कर देणो सोपे काम नाही. येत्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभव बघावा लागेल. उत्तराखंडच्या पोटनिवडणुकीत तीन जागा जिंकल्या म्हणजे काँग्रेस पुन्हा परतणार हा विचार करणो मोठी भूल ठरेल. कार्यकत्र्यामुळे नव्हे तर नेतृत्वामुळे काँग्रेसला पराभव पत्करावा लागला हे सत्य आहे. त्यामुळे चूक कशी सुधारायची याचा विचार काँग्रेसच्या नेतृत्वालाच करावा लागेल असेही नटवरसिंग यांनी स्पष्ट केले.
मनमोहनसिंग यांची कामगिरी वाईट..
च्मनमोहनसिंग यांची कामगिरी संपुआ-2 च्या काळात अतिशय वाईट राहिली. 2 जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घोटाळ्याचे आरोप झाले. सोनिया गांधी शांत राहिल्या. त्यांनी बेधडकपणो समोर येऊन बोलायला हवे होते, पण त्यांनी तसे केले नाही. एक निवडणूक जिंकली तर मनमोहनसिंग आपल्यामुळेच निवडणूक जिंकली असे मानू लागले. ही मोठी चूक होती.