शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

खासगी विहिरींना उपसाबंदी नाही

By admin | Updated: April 21, 2016 00:59 IST

पाणीटंचाई प्रश्न : चंद्रकांतदादांची माहिती; ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल

कोल्हापूर : खासगी विहिरी व कूपनलिकांना उपसाबंदी नाही, अशी माहिती पालकमंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी दिली. खरीप पूर्वतयारी बैठकीत पाणीटंचाईचा विषय चर्चेला आला. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरील उपसाबंदी कशी अन्यायकारक आहे, यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी (दि. १८) ‘खासगी विहिरी, कूपनलिकांवरही आता उपसाबंदी’ या मथळ्याखाली प्रसिद्धी झाले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी खुलासा केला. स्वतंत्र फिडर नसल्यामुळे वीज वितरण कंपनी सरसकट थ्रीफेज वीजपुरवठा बंद करीत आहे. त्यामुळे खासगी विहिरी व कूपनलिका यांना उपसाबंदी करावी लागत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. यावर मंत्री पाटील म्हणाले, वीज वितरण कंपनीची ही तांत्रिक अडचण आहे. चुकीचा संदेश जायला नको. खासगी विहिरी, कूपनलिका यांना उपसाबंदी नाही. जिल्ह्यात कोठेही टंचाईची परिस्थिती नाही. १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, अशी माहिती सर्व वृत्तपत्रांना कळवा. शेती पंपाच्या प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार करून दिल्यास ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून निधी मिळविता येईल. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्यावा.वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता शंकर शिंदे म्हणाले, ७ हजार ९३४ कृषी वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जोडणीसाठी मूलभूत सुविधा नाही, अशा ठिकाणचे हे प्रलंबित कनेक्शन आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करून त्वरित वीज जोडणी देण्यासाठी दहा कोटी निधीची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)