शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेसाठी खासगी कंपन्यांत स्पर्धा रंगणार

By admin | Updated: August 11, 2016 01:45 IST

सौरऊर्जेची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमधे स्पर्धेला प्रोत्साहन देत देशात सौरऊर्जा (सोलर पॉवर) अधिक स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीसौरऊर्जेची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमधे स्पर्धेला प्रोत्साहन देत देशात सौरऊर्जा (सोलर पॉवर) अधिक स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे. नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने या स्पर्धेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत. सरकारच्या अपेक्षेनुसार हा प्रयोग यशस्वी झाला तर ग्राहकांना अधिक स्वस्तात वीज उपलब्ध होऊ शकेल. नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारने देशात सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य पाच पटीने वाढवले आहे. मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सौरऊर्जा कंपन्यांमधल्या स्पर्धेला अधिक उत्तेजन दिले जाणार असून ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. सौरऊर्जा क्षेत्रात ग्रीड कनेक्टेड सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांसाठी टॅरिफ बेस्ड कॉम्पिटेटिव्ह बिडिंगचे तत्त्व अवलंबले जाणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या सरकारी व खासगी कंपन्यांना बरोबरीची संधी देण्यात येईल. परवानाधारक सौरऊर्जा वितरण कंपन्यांकडून अधिकाधिक वीज खरेदी करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा इरादा असल्याने सौरऊर्जा निर्माते, वितरक व ग्राहक यांच्यातील व्यवहारात अधिक पारदर्शकता आणणे, हा नव्या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. कसे असेल स्पर्धेचे स्वरूपइलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट २00३ च्या उद्देशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की वीजनिर्मिती आणि वितरणात स्पर्धेला उत्तेजन दिले पाहिजे. मंत्रालयाने सौरऊर्जेसाठी मार्गदर्शक तत्त्वे त्यानुसारच तयार केली आहेत. सौरऊर्जा निर्मिती कंपन्या वीज विक्रीच्या लिलावासाठी प्राथमिक दर जाहीर करतील आणि वीज खरेदी करणाऱ्या कंपन्या लिलावातील दरानुसार ही वीज खरेदी करतील. या व्यवहारामुळे सौरऊर्जा निर्मात्यांमधील स्पर्धा वाढेल. अशी गरज नाही की सौरऊर्जेची सारी वीज केवळ डिस्कॉमच खरेदी करील. एखादी खासगी वीज वितरण कंपनीही डिस्कॉमच्या माध्यमातून सौरऊर्जा वीज विक्रीचा करार करून त्याचे वितरण करू शकेल. खासगी वितरण कंपनीला ताशी ७ पैसे प्रति किलोवॅट दराने व्यावसायिक नफा कमवता येईल. मार्गदर्शक तत्त्वानुसार सौरऊर्जा निर्माते व वितरक यांना किमान २५ वर्षांचा वीज खरेदी करार करावा लागेल. दरवर्षी वीज दर किती प्रमाणात वाढेल, हे या करारातच नमूद असेल.भारतात सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य मोदी सरकारने वाढवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सौरऊर्जा विकासकांचे लक्ष भारताने वेधून घेतले आहे. त्यांच्या सहभागामुळे देशात ग्राहकाला स्वस्त दरात वीज उपलब्ध होण्याचा मार्ग लवकरच प्रशस्त होणार आहे.