शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी बसमधून पावणेपाच लाख लंपास

By admin | Updated: November 7, 2015 00:03 IST

जळगाव- अहमदाबादकडे जाणार्‍या एका खाजगी बसमधून चार लाख ७८ हजार रुपये लंपास केल्याची घटना स्टेडियम परिसरात स्वामिनारायण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव- अहमदाबादकडे जाणार्‍या एका खाजगी बसमधून चार लाख ७८ हजार रुपये लंपास केल्याची घटना स्टेडियम परिसरात स्वामिनारायण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली, त्यात हा प्रकार फिर्याददारांचा बनाव असल्याचा दावा जिल्हापेठ पोलिसांनी केला आहे.
बस गुजरातची
प्रवासी वाहतूक करणारी बस (क्र.जीजे ०१ वाय ००७०) गुजरातची आहे. ही बस भुसावळ येथून चार प्रवासी घेऊन जळगावात आली. येथे बसमध्ये १४ प्रवासी स्टेडियम परिसरातून बसले. बस अहमदाबादला जात होती. याच बसमध्ये पैसे चोरी प्रकरणातील फिर्याददार पंकज प्रवीणभाई पटेल, भातीजी राजाजी ठाकूर, जयेश जयंतीभाई पटेल (सर्व रा.महिसाणा, ह.मु.बळीराम पेठ) हेदेखील बसले. या तिघांनी शहरातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सतर्फे तिकिटे घेतली होती.

दोघे हवालाशी संबंधित
पंकज पटेल व जयेश पटेल हे हवाला बाजाराशी संबंधित आहे. तर भातीजी ठाकूर हा स्वयंपाकी आहे. शहरातील व्यापारी व इतर व्यावसायिकांकडून घेतलेले पैसे गुजरातेत आपल्या मालकांकडे देण्याचे काम दोघे करतात. पण त्यांनी चार लाख ७८ हजार रुपये कुणाकडून घेतले व आपला मालक कोण याची नेमकी माहिती पोलिसांना दिलेली नाही.

पाणी घ्यायला तिघे उतरले आणि चोरी झाली
तिघे अहमदाबादला जाण्यासाठी बसमध्ये स्टेडियम परिसरात बसले. त्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी तिघे उतरले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तिघे खाली असतानाच बसच्या उघड्या खिडकीतून आत येऊन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पैसे चोरले. पैसे एका प्लास्टिकच्या आवरणाला चिकटप˜ीने गुंडाळले होते. हे आवरण बॅगमध्ये तसेच काढून फेकले व पैसे नेले, असे पंकज पटेलने फिर्यादीत म्हटले आहे.

स्वामी नारायण ट्रॅव्हल्सच्या सीसीटीव्हीत घटना कैद, पोलीस अनभिज्ञ
बस स्टेडियम परिसरात स्वामी नारायाण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर उभी होती. या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात कुणीतरी बॅगमधून पैसे काढून त्याला गुंडाळलेले आवरण काढून पेसे नेत असल्याचे दिसते, असे बसमधील काही प्रवाशांनी सांगितले. याबाबत पोलिसांना विचारलेे असता असे सीसीटीव्ही आम्ही पाहिले नाही. ही ऐकीव माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.