शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जेलमध्ये शशिकलांना मिळाली सीरियल किलर शेजारीण

By admin | Updated: February 18, 2017 10:01 IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना तुरुंगात खतरनाक गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली शेजारीण मिळाली आहे.

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना तुरुंगात खतरनाक गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली शेजारीण मिळाली आहे. सायनाइड मल्लिका या नावाने कुख्यात असलेली ही महिला गुन्हेगारी जगतातील पहिली लेडी सीरियल किलर असल्याचे बोलले जाते. यावरुन, राजकीय कारणांमुळे जाणूनबुजून शशिकला यांचा जीव धोक्यात घातला जात आहे, असा मुद्दा त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केला आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराप्पणा अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील ज्या महिला बराकीत  शशिकला यांना ठेवण्यात आले आहे, त्याशेजारी असणा-या सेलमध्ये के.डी.केपाम्मा उर्फ सायनाइड मल्लिका ही महिला आपली शिक्षा भोगत आहे. सायनाइड मल्लिकाने आतापर्यंत सहाहून अधिक महिलांना शिकार बनवून त्यांना ठार केले आहे.  मल्लिका मुख्यतः मंदिरात येणा-या-जाणा-या महिलांना आपला शिकार बनवायची. महिलांशी मैत्री करुन चलाखीने त्यांना सायनाइड खाऊ घालायची आणि त्यांचे पैस, दागिने, महागड्या वस्तूंची चोरी करुन ती फरार व्हायची.   
 
सायनाइड मल्लिकावर बंगळुरू आणि आसपासच्या परिसरात अनेक गुन्हे केल्याची नोंद आहे. निष्पाप महिलांना फसवणा-या या मल्लिकाच्या 2008मध्ये पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितनुसार, 52 वर्षांची सायनाइड मल्लिका शशिकला यांच्यासोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ती नेहमी शशिकला यांच्या आसपास वावरत असते. जेवणाच्या रांगेतही त्यांना उभे राहू देत नाही, तर स्वतः जाऊन शशिकलांसाठी जेवणाचं ताट आणते. या सर्व प्रकारावर एआयएडीएमकेतील सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 
(मी चोर नाही, मी पोलीस जीपमध्ये बसणार नाही - शशिकला)
दरम्यान, कारागृहाचे अधीक्षक कृष्ण कुमार यांनी सांगितले की, सायनाइड मल्लिकापासून कोणलाही धोका नाही. ज्या सेलमध्ये शशिकला यांना ठेवण्यात आले आहे. त्या सेलमध्ये शशिकलांपूर्वी हत्येचा आरोप असलेल्या उच्चभ्रू वकील शुभा शंकरनारायण यांनी मल्लिकासोबत अनेक वर्ष शिक्षा भोगली.