ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ - काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांचं श्रेय भाजपा लाटत असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीहल्ला करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. नागपूरमधल्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी मोदी नागपूरात आले आहेत. परंतु, मोदींच्या सभेमध्ये अन्य पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची हुर्यो उडवली जात असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँक चौकामध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह १५० काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी त्यांची पोलीसांची बाचाबाची झाली व अखेर पोलीसांनी लाठिमार करत सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.