शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्नलच्या घरावर छापा, 1 कोटी आणि विदेशी शस्त्रास्त्रांसह मांस जप्त

By admin | Updated: April 30, 2017 10:47 IST

निवृत्त कर्नलच्या घरातून जवळपास 1 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - महसूल गुप्तचर संचालनालया(DRI)च्या एका टीमनं मेरठच्या सिव्हिल लायन्स भागातून लष्कराचे माजी निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि त्यांचा मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोई यांच्या घरी गोपनीय सूचनेच्या आधारावर छापा मारला आहे. या छापेमारीत निवृत्त कर्नलच्या घरातून जवळपास 1 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. तसेच जंगली जनावरांची चरबी, डोकं, शिंग असे अवयव सापडले असून, शूटिंगचे 40 रायफर्ल आणि पिस्तुलसहीत जवळपास 50 हजार काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तसेच दुर्लभ आणि बंदी असलेल्या वन्य जीवांचे 117 किलो मांस हस्तगत करण्यात आलं आहे. DRIच्या टीमनं सर्व वस्तू सील करून स्वतःसोबत नेल्या आहेत. नवी दिल्लीहून आलेल्या या टीमनं शनिवारी सकाळी 11.30 वाजता कारवाई सुरू केल्यानंतर ती रविवारी पहाटे 3.30 वाजता पूर्ण झाली. या छापेमारीत डीआरआयच्या टीमसोबत वन विभागाचे अधिकारी, पोलिसांची टीमही सामील होती. 16 तास चाललेल्या कारवाईत डीआरआयच्या टीमला मोठं यश मिळालं आहे. निवृत्त कर्नलच्या घरातून सांभर, काळवीट, बिबट्याची कातडी, सांभराचं डोकं, शिंग आणि इतर सामान जप्त केलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालया(DRI)ची टीम येण्याची खबर मिळताच निवृत्त कर्नल यांचा मुलगा फरार झाला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नल आणि त्याच्या मुलाच्या घरावर छापा टाकण्यात आला असून, विदेशी रायफल्स आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. तसेच रायफल्स आणि पिस्तुलांचे कुटुंबीयांकडे लायसन्स उपलब्ध नाही .