शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान सचिवाला लाचप्रकरणी अटक

By admin | Updated: September 18, 2015 02:39 IST

बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८

जयपूर : बंद केलेली खाण पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नातून भ्रष्टाचाराची खाण खणण्याचा नोकरशाहीचा धक्कादायक उद्योग उजेडात आला आहे. लाच म्हणून दिलेली तब्बल चार कोटी २८ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आलेल्या या प्रकरणातून नोकरशाही किती वरपर्यंत पोखरली आहे, हेही अधोरेखित झाले आहे. राजस्थानचे प्रधान सचिव (खाण) अशोक सिंघवी यांना गुरुवारी पहाटे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) अटक केल्यानंतर या लाच प्रकरणाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. १९८३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सिंघवी हे उदयपूर येथील राजस्थान राज्य खाण आणि खनिज लिमिटेडचे चेअरमनदेखील आहेत. सिंघवी यांच्या विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांना बुधवारी उदयपूर आणि रिलवाडा येथील लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी रात्री सिंघवी यांना आधी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती पहाटे त्यांना अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईपूर्वी सिंघवींच्या जयपूर येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर एसीबी कार्यालयात नेऊन त्यांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या लाच प्रकरणातील ४.२८ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या रकमेपैकी २.५५ कोटी रुपये सिंघवी आणि इतरांना देण्यात आले होते.चित्तोडगड येथील आपली बंद करण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करण्यासाठी या खाणीचा मालक शेरखान याने ही २.५५ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा आरोप आहे. राजस्थानच्या खनन विभागाने शेरखानच्या एकूण सहा खाणींचे लीज रद्द केले होते. कुणी लाच मागितल्याची तक्रार शेरखानने केली नसली तरी आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केली, असे एसीबीचे महासंचालक नवदीप सिंग म्हणाले. खान याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याने ही २.५५ कोटीची लाच आपल्या चार्टर्ड अकाउंटन्टला दिली होती आणि त्याने ती खाण विभागाचा दलाल संजय सेठी याला दिली. नंतर सेठी याने रक्कम उदयपूरचे अतिरिक्त संचालक (खाण) पंकज गहलोत आणि प्रधान सचिव अशोक सिंघवी यांच्याकडे पोहोचती केली, असा आरोप आहे. गेहलोतसह खाण अभियंता पी.आर. अमेटा, सीए श्याम सिंग सिंघवी, संजय सेठी आणि राशीद खान यांना आधीच अटक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)