शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

By admin | Updated: May 5, 2017 01:31 IST

देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे

सुरेश भटेवरा /नवी दिल्लीदेशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे अर्धातास चाललेल्या या भेटीत पवारांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या हमी भावात वाढ, शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज आदी उपाययोजनांचा आग्रह धरला. या महत्वपूर्ण भेटीत मोदींना उद्देशून पवार म्हणाले, देशातला शेतकरी वर्ग संकटात आहे. वर्षभरात जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४२९१ शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातही परिस्थिती गंभीरच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीची उपाययोजना केली नाही तर हा प्रश्न स्फोटक बनेल. पवार पंतप्रधानांना म्हणाले, युपीए सरकार सत्तेवर असतांना देशातल्या शेतकऱ्यांचे ७0 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याखेरीज अन्य उपायांचीही अमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. उत्तरप्रदेशात भाजपने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली. साहजिकच देशभर संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी हवी आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातल्या तूर खरेदीच्या समस्येकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पवारांच्या साऱ्या सुचना शांतपणे ऐकल्यावर पंतप्रधान म्हणाले, केंद्र विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्र्रीत करीतच आहे. तथापि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पवारांनी स्वत: पुढाकार घेतल्यास सरकारला मदत होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी मार्गदर्शन करावे, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करायला केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी पवारांना दिले.ईडीच्या धाडींतील गैरप्रकारांची तक्रारमुंबई व महाराष्ट्रात सध्या सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरू आहे. करबुडव्यांवर धाडी घालण्याची कारवाई कायदेशीर असली तरी या धाडी दरम्यान धाकदपटशाचा मार्ग अवलंबून अधिकाऱ्यांतर्फे संबंधितांना लुबाडण्याच्या गंभीर घटना घडत असल्याचे कानावर येत आहे, अशी गंभीर तक्रार नोंदवीत पवार पंतप्रधानांना म्हणाले, सक्त वसुली संचलनालयातर्फे महाराष्ट्रात यापूर्वी असा अतिरेक कधी घडलेला नाही. त्यावर पंतप्रधान म्हणाले, अशाच काही तक्रारी माझ्याही कानावर आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.