शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

परराष्ट्र धोरण कौशल्याने हाताळणा-या पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:22 IST

आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख ‘अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे’ असा केला होता.

- मणिशंकर अय्यर

(माजी केंद्रीयमंत्री)आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी इंदिरा गांधी यांच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख ‘अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे’ असा केला होता. बांगलादेशची मुक्ती आणि पाक-रशियाला शिकवलेला धडा, अण्वस्त्र निर्मितीबद्दल घेतलेली भूमिका असे सारेच निर्णय त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळले... हीच त्यांची खुबी होती.पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विविध क्षेत्रांतील यशांपैकी महत्त्वाचे यश म्हणजे त्यांनी परराष्ट्र धोरणाला दिलेला आकार. त्यातही उल्लेखनीय म्हणजे डिसेंबर १९७१मध्ये जिंकलेल्या बांगलादेश युद्धात पंधरवड्यात मिळालेले यश. या विजयामुळेच त्यांना 'दुर्गामाता' हे सार्थ नामाभिधान मिळाले होते.पूर्व पाकिस्तानात मुजीबुर रेहमान व अवामी लीगवर पश्चिम पाकिस्तानचा वरंवटा चालू लागल्यावर इंदिरा गांधी यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने पावले उचलत बांगलादेशी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्ती वाहिनीला मदत करत तसेच बांगलादेशी राजकीय नेत्यांना भारतात आश्रय देत लष्करी कारवाईसाठी परिस्थिती निर्माण केली. एक कोटी निर्वासितांना तात्पुरता निवारा देऊन बांगलादेशातील स्थिती निवळल्यावर मातृभूमीध्ये पुन्हा जाता येईल, अशा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. त्यानंतर इंदिराजींनी फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम, आॅस्ट्रिया अशा युरोपीय देशांचा दौरा त्यांनी केला. अमेरिकेलाही भेट दिली.मूलतत्त्ववाद्यांच्या मदतीने पाकचे लष्कर पूर्व पाकिस्तानात कसे अत्याचार करत आहे याची माहिती त्यांनी पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांना दिली. पुढचे पाऊल लष्करी व मुत्सद्दी पातळीवर महत्त्वाचे होते. ९ आॅगस्ट रोजी त्यांनी भारत-सोव्हिएत शांतता, मैत्री व सहकार्य करार केला. पाकिस्तानला वाचवायला अमेरिका वा चीन-अमेरिका एकत्र आले तर त्यासाठीची ही तरतूद होती. जगातील विविध नेत्यांना या विषयाचे महत्त्व पटल्यानंतर आणि सैन्याची पूर्ण तयारी झाल्यानंतरच ३ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी पाकिस्तानवर आक्रमण केले. अण्वस्त्रसज्ज अशी यूएसएस एन्टरप्राइज युद्धनौका बंगालच्या उपसागरात येऊनही त्या मागे हटल्या नाहीत. स्वतंत्र बांगलादेशातून आपल्या फौजा तीन महिन्यांमध्ये मागे घेऊन आपण पूर्व पाकिस्तानचे केवळ मुक्तीदाते होतो हे दाखवून दिले. युद्धातून उरलेल्या पाकचे नेते झुल्फिकार अली भूट्टो यांना सिमल्यात परिषदेसाठी बोलावून शांततेसाठी प्रयत्नशील असल्याचे संकेतही दिले. जवळपास ५० वर्षांनंतरही सिमला करार हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांतील चिरकाल यश असल्याचे दिसून येते.बंगालच्या उपसागरात अमेरिकेची युद्धनौका आल्याने भारताचे अणू सामर्थ्य दाखवण्याची वेळ आली. पोखरणमध्ये १८ मे १९७४ रोजी चाचणी घेऊन भारत अण्वस्त्र सामर्थ्य असणाºया देशांच्या पंगतीत जाऊन बसला. न्यूक्लिअर नॉनप्रोलिफेरेशन ट्रीटी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देत एकांगी व भेदभाव करणाºया करारांद्वारे आण्विक शस्त्रकपात शक्य नाही असा संदेश दिला. तरीही अण्वस्त्रकपातीच्या जागतिक चळवळीच्या नेत्या अशी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. अलिप्त राष्ट्र चळवळीचे १९८३ साली अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी या चळवळीला जगातील सर्वात मोठी शांतता चळवळ संबोधून सहा देशांच्या पुढाकाराने अण्वस्त्रकपात करून जगाला भयंकर संकटापासून वाचविण्याचे प्रयत्न केले.१९६६-६७मध्ये प्रथमच भारताचे नेतृत्व स्वीकारल्यावर त्यांनी व्हिएतनाम युद्ध अमेरिकेने थांबवावे व पॅलेस्टाइनला न्याय मिळावा आणि क्युबाचे सार्वभौमत्त्व टिकावे यासाठी प्रयत्न सुरू केले. चीन व भारत यांतील दरी इंदिरा गांधी यांच्याच काळात मिटायला सुरुवात झाली. चीनच्या बाबतीत त्यांनी काळजीपूर्वक पावले टाकली.रशियाशी संबंधही काळाच्या कसोटीवर तपासले. डिसेंबर १९७९ साली सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या तेव्हा भारत-सोव्हिएत युनियन संबंध ताणले गेले. त्यानंतर काही काळातच इंदिराजी पुन्हा सत्तेत आल्या. त्यांनी सोव्हिएत युनियनचा निषेध करणाºया जागतिक कोरसमध्ये जाण्यास नकार दिला. परंतु अफगाणिस्तानात घुसून सार्वभौमत्वावर केलेले आक्रमण मागे घ्यावे असे रशियन नेतृत्वाला त्यांनी स्पष्टपणे सांगितले.इंदिरा गांधींच्या काळातील आंतरराष्ट्रीय धोरणाचे विश्लेषक व्ही. पी. दत्त यांनी ‘अ सेंटेनरी हिस्टरी आॅफ द काँग्रेस’ या ग्रंथात त्यांच्या धोरणांचे वर्णन अत्यंत परिपक्व आणि भारताचे कमीत कमी नुकसान करणारे धोरण असे केले आहे. ते म्हणतात, 'असं नाही की तेव्हा चुका झाल्याच नाहीत, परंतु त्यापेक्षा भारताचा लाभ होण्यासाठी अत्यंत कौशल्याने व आत्मविश्वासाने परराष्ट्र धोरणातील आव्हाने हाताळली गेल्यामुळे त्यांच्यावर मात करता आली.'

(शब्दांकन - ओंकार करंबेळकर)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष