शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीवर १ रुपयाही खर्च केला नाही

By admin | Updated: February 1, 2015 12:03 IST

लोकसभा निवडणूक प्रचारात वाराणसीच्या मतदारांना विकासाचे गाजर दाखवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही वाराणसीवर खर्च केलेला नाही.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - लोकसभा निवडणूक प्रचारात वाराणसीच्या मतदारांना विकासाचे गाजर दाखवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या खासदार निधीतील एक रुपयाही वाराणसीवर खर्च केलेला नाही. तर महाराष्ट्रातील खासदारही खासदार निधी खर्च करण्यात उदासीन दिसत आहेत. 

केंद्र सरकारकडून लोकप्रतिनिधींना आत्तापर्यंत मिळालेला एकूण विकास निधीं व त्यापैकी खर्च झालेला निधी याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीला जवळपास ८ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. देशभरातील ३६ राज्यांमधील (केंद्रशासीत प्रदेश मिळून) फक्त १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील खासदारांनी अद्याप खासदार निधीला हातही लावलेला नाही. 

मे २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत खासदारांना एकूण १२४२.५० कोटी रुपयांचा खासदार निधी देण्यात आलेला आहे.  उत्तरप्रदेशमधून ८० खासदार लोकसभेवर निवडून जातात. यामध्ये वाराणसी मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशमधील खासदारांना खासदार निधींतर्गत आत्तापर्यंत १९७.५० कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र यापैकी एकाही खासदाराने हा निधी खर्च केलेला नाही. 

खासदारांना दरवर्षी ५ कोटी रुपयांचा खासदार निधी विकास कामांसाठी दिला जातो. या निधीतून खासदार त्यांच्या मतदारसंघातील गरजा पूर्ण करु शकतात. हा निधी पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यासाठी वापरला जाऊ शकतो.