शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या जिवाला धोका

By admin | Updated: July 5, 2015 04:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० संघटनांकडून धोका असून, मुस्लिम दहशतवाद्यांसोबतच कट्टर हिंदुत्ववाद्यांचेही ते लक्ष्य असल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० संघटनांकडून धोका असून, मुस्लिम दहशतवाद्यांसोबतच कट्टर हिंदुत्ववाद्यांचेही ते लक्ष्य असल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. या ४० संघटनांमध्ये विविध दहशतवादी संघटनांसोबतच नक्षलवादी, ईशान्येकडील बंडखोर आणि अंडरवर्ल्डचाही समावेश आहे. गेल्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनी हवाई हल्ल्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिल्लीतील राजपथ आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने हा अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांसोबतच काही कट्टररपंथी हिंदुत्ववादी संघटनांकडूनही मोदींच्या जीवाला धोका आहे. मोदी हे मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी अवाजवी प्रयत्न करीत असल्याचे काही हिंदुत्ववादी संघटनांचे मत झाले आहे. शिवाय गुजरात दंगलप्रकरणात अनेक हिंदू नेत्यांना शिक्षा झाली हे सुद्धा एक कारण आहे. योगदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधी अहवाल तयार करताना धोक्याचा हा नवा पैलू लक्षात आल्याचे दिल्ली पोलिसातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुत्ववाद्यांकडून धोका नाहीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदुत्ववादी तत्त्वांकडून धोका असल्याचे वृत्त केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळले आहे. यासंदर्भातील वृत्त निराधार असून असा कुठलाही अहवाल आला नसल्याचा दावा मंत्रालयातील सूत्रांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)