शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे पंतप्रधान मोदी पहिले परदेशी नेते

By admin | Updated: June 24, 2017 09:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. जवळपास 5 तासांची ही भेट असणार असल्याची माहिती मिळत आहे.  दोन्ही नेते दुपारी 3.30 वाजता भेटतील त्यानंतर मीडियासाठी काही वेळ दिला जाणार आहे. 
 
त्यानंतर प्रतिनिधी पातळी स्तरावरील चर्चा होईल, त्यानंतर आदरातिथ्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. 
या दिवसाचा शेवट रात्री व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभानं होणार आहे. दरम्यान मोदी अमेरिका दौ-यावर जाणारे पहिले परदेशी नेते आहेत जे ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत. 

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते दहशतवादासंदर्भातील समस्या, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणातील मदत आणि आशिया-पॅसिफिकमध्ये भारताची भूमिका वाढवण्यासाठी मदत करण्यासंदर्भात चर्चा करू शकतात. शिवाय, चर्चेबाबत दोन्ही नेते मीडियामध्ये संक्षिप्त स्वरुपात माहिती देतील.

 
चर्चा केल्यानंतर ते संयुक्त निवेदन देतील मात्र मीडियाच्या प्रश्नांना स्वतंत्र उत्तर देणार नाहीत. सोमवारी 26 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. या दौ-यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्विटदेखील केले आहे. माझ्या अमेरिका दौ-याचं मुख्य लक्ष्य आपल्या देशांमधील संबंध बळकट करणं हा आहे.  भारत- अमेरिकेमधील मजबूत संबंधांचा फायदा आपल्या देशांना आणि जगाला आहे.