नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा आटोपून शनिवारी पहाटे मायदेशी परतले. आपल्या या दौऱ्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या दौऱ्यादरम्यान फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांचा सौदा, तसेच कॅनडाशी युरेनियमसह विविध महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दिल्ली भाजपचे प्रमुख सतीश उपाध्याय यांच्यासह पक्षाचे आमदार आणि इतर वरिष्ठ नेते पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पालम येथील हवाई दलाच्या तळावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी मायदेशी परतले
By admin | Updated: April 19, 2015 01:31 IST