शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी विधेयकाची कोंडी फुटण्याची पंतप्रधानांना आशा

By admin | Updated: March 10, 2017 01:01 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास गुरुवारी पुन्हा सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाची कोंडी फुटेल, अशी आशा व्यक्त

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास गुरुवारी पुन्हा सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाची कोंडी फुटेल, अशी आशा व्यक्त केली. यावर लोकशाही मार्गाने चर्चा होईल, असेही ते म्हणाले.मोदी यांनी संसदेबाहेर सांगितले की, जीएसटी विधेयकाची कोंडी फुटेल. सर्व राज्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच प्रमाणे सर्व राजकीय पक्षांचा प्रतिसादही सकारात्मक आहे. महिनाभराच्या सुटीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सुरू झाला. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही सुटीनंतर भेटत आहोत. अर्थसंकल्पीय प्रस्तावांवर विस्ताराने चर्चा होईल.सभागृहात निकोप चर्चा होईल, अशी मला अपेक्षा आहे. माझा विश्वास आहे की, चर्चा ही उच्च पातळीवरची असेल. गरीबांशी संबंधित मुद्दे उपस्थित होतील. लोकशाही पद्धतीने सहमती निर्माण करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. अधिवेशन संपण्यापूर्वी जीएसटीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा आशावादही मोदी यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)संसदेत असा असेल जीएसटीचा प्रवास- जीएसटीकडे देशातील सर्वांत मोठी कर सुधारणा म्हणून पाहिले जात आहे. त्यातून सकळ राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान १ टक्का भर पडेल, असे मानले जात आहे. येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याची सरकारची योजना आहे. सेंट्रल जीएसटी विधेयक संसदेत मांडण्याची तयारी सरकारने केली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर स्टेट जीएसटी विधेयके राज्यांच्या विधानसभांत मंजूर करून घेतली जातील. जीएसटीसाठी करण्यात आलेली घटनादुरुस्ती सप्टेंबरच्या मध्यात रद्द होणार आहे. त्यापूर्वी जीएसटी प्रणाली सरकारला लागू करावी लागेल.