शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी बिहारसाठी केली १.६५ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

By admin | Updated: August 19, 2015 08:52 IST

येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणा-या बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक लाख ६५ हजार कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमत
आरा (बिहार), दि. १८ -  येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणा-या बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सव्वा लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. याखेरीज आधी जाहीर केलेले ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज विचारात घेतलं तर निवडणुकांचे वारे वाहू लागलेल्या बिहारला केंद्र सरकारने एकूण मिळून १.६५ लाख रुपये कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. बिहारला एक नवी ताकद मिळावी अशी आपली इच्छा असल्याचे ते यावेळी म्हणाले. आरा येथे राष्ट्रीय महामार्ग प्रोजेक्टचे उद्घाटन केल्यानंतर झालेल्या सभेत या पॅकेजची घोषणा करतानाच या पॅकेजमध्ये सध्या सुरू असलेल्या प्रोजेक्टसचे ४० हजार कोटीही समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. 
या सभेदरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्यावरही निशाणा साधला. बिहारला 'बिमारू' राज्य म्हटल्याने मुख्यमंत्री नाराज झाले. जर बिहार 'बिमारू' नसेल तर मग ( त्यांना) केंद्राकडून मदत कशासाठी हवी असा सवाल करत पंतप्रधानांनी नीतिशकुमार यांच्यावर टीका केली.
बिहारमध्ये त्यांनी सहरशा येथेही एक सभा घेतली असून स्थानिक मैथिली भाषेत बोलण्याची सुरुवात करत त्यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
वा-याची दिशा स्पष्ट समजत असून इथलं सरकार बदलण्याचे वारे वाहत असल्याचे त्यांनी सूचित केले. नितिशकुमारांचं नाव न घेता मोदींनी व्यक्तिगत अहंकार किती मोठा असतो असे सांगत त्यांच्यावर टीका केली. मी माझ्यावर झालेल्या व्यक्तिगत टीकेला प्रतिवाद करत नाही, तर अशी टीका सहन करण्यासाठी सक्षम करतो.
सात वर्षांपूर्वी कोशी आंचलच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गुजरातमधल्या जनतेच्यावतीने माझ्या सरकारने पाच कोटी रुपयांची मदत केली. परंतु स्वत:च्या अहंकारापोटी त्यांनी लोकांचं काय व्हायचं ते होऊदे अशी भूमिका घेत तो चेक परत पाठवल्याची आठवण नरेंद्र मोदींनी करून दिली. मी स्वत: तो अपमान विसरून गेलो आणि लोकांची पीडा दूर व्हावी म्हणून काही लोकांना गुपचूप मदत करायला सांगितली असेही मोदी म्हणाले.