शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, खासदारांची वेतनवाढही दृष्टिपथात

By admin | Updated: December 6, 2015 01:41 IST

केजरीवाल सरकारचे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात चौपट वाढ झाल्यानंतर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या वेतनातही वाढ करण्याच्या चर्चेची कुजबूज सरकार

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीकेजरीवाल सरकारचे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात चौपट वाढ झाल्यानंतर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या वेतनातही वाढ करण्याच्या चर्चेची कुजबूज सरकार आणि संसदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. तथापि वेतनवाढीबाबत होणारी सार्वत्रिक टीका लक्षात घेता, केंद्र सरकार या संदर्भात अत्यंत सतर्क आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मंत्री व खासदारांच्या वेतनवाढीबाबतही एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी दिली.वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मिळतात. कॅबिनेट सचिवांना त्यानुसार पुढील वर्षापासून दरमहा अडीच लाख रूपये वेतन मिळेल. त्यापेक्षा पंतप्रधानांचे वेतन १0 हजारांनी अधिक, केंद्रीय मंत्र्यांचे ८ हजारांनी तर राज्यमंत्र्यांचे ५ हजारांनी अधिक असावे, तसेच खासदारांचे वेतन केंद्रीय सचिवांपेक्षा दरमहा १ हजार रूपयांनी अधिक असावे, असा प्रस्ताव सध्या सरकार समोर आहे. मंत्री व खासदारांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रतिवर्षी १0 ते १२ टक्क्यांची वाढ देण्याची तरतूद या स्थायी व्यवस्थेत निर्माण झाल्यास, देशभर राजकीय नेत्यांच्या पगारावर होणाऱ्या गैरवाजवी टीकेतून कायमची सुटका होईल. त्यासाठी नवे सूत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार कॅबिनेट सचिवाचे मूळ वेतन २.५0 लाख रूपये असेल तर केंद्रीय सचिवाचे मूळ वेतन २.४0 लाख रूपये असेल. वेतनवाढीचा नवा फॉर्म्युला मान्य झाल्यास, पंतप्रधानांना २.६0 लाख, केंद्रीय मंत्र्यांना २.५८ लाख, राज्यमंत्र्यांना २.५५ लाख रूपये दरमहा तर खासदारांना २.४१ लाख रूपये दरमहा मिळतील. पंतप्रधान, मंत्री व खासदारांच्या वेतनाला असे रचनात्मक स्वरूप देण्यात सरकार यशस्वी ठरले तर राज्यांमध्येही मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांसाठीही या फॉर्म्युल्याचे एक मॉडेल तयार होईल, असे या सूत्रांनी सांगितले.७ व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणारकेंद्रीय मंत्री व खासदारांचे पगार यापूर्वी आॅगस्ट २0१0 साली वाढवण्यात आले होते. २0१६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान, मंत्री व खासदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने वर्तविली.