शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

थ्रीजी स्पेक्ट्रमच्या लिलावाची किंमत २२ टक्क्यांनी कमी

By admin | Updated: January 1, 2015 02:19 IST

दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) अखिल भारतीय थ्रीजी स्पेक्ट्रमसाठी आधारमूल्य प्रतिमेगाहर्टझ् २,७२० कोटी रुपये असावे, अशी शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) अखिल भारतीय थ्रीजी स्पेक्ट्रमसाठी आधारमूल्य प्रतिमेगाहर्टझ् २,७२० कोटी रुपये असावे, अशी शिफारस केली आहे. याआधी झालेल्या लिलावाच्या किमान मूल्यापेक्षा ही शिफारस २२ टक्क्यांनी कमी असल्यामुळे मोबाईल कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०१० मध्ये थ्रीजी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी ३,५०० कोटी रुपयांचे राखीव मूल्य निश्चित केले गेले होते.ट्रायने बुधवारी अशी शिफारस केली की दूरसंचार विभागाला लिलावासाठी आणखी १५ मेगाहर्टझ् स्पेक्ट्रम सादर करायला हवे जे की संरक्षण विभागाबरोबर अदलाबदलीत मिळेल; परंतु विभागाला आशा आहे की संरक्षण मंत्रालयाकडून थ्रीजी बँडचे (२,१०० मेगाहर्टझ्) ५ मेगाहर्टझ् स्पेक्ट्रमच मिळू शकते.ट्रायने म्हटले आहे की, प्राधिकरणने शिफारस केली आहे की, प्रत्येक लायसन्स सेवा क्षेत्रात (सर्कल) २,१०० मेगाहर्टझ् बँड स्पेक्ट्रमची किमान किंमत २,७२० कोटी रुपये असली पाहिजे. संरक्षण मंत्रालय १,९०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रम बदल्यात २,१०० मेगाहर्टझ् बँडपैकी १५ मेगाहर्टझ् रिकामे करून देणार आहे. संरक्षण विभागाशी तात्त्विक पातळीवर झालेल्या करारानुसार जे स्पेक्ट्रम उपलब्ध होणार आहे ते लगेचच उपलब्ध झाले नाही तरीदेखील लिलावासाठी उपलब्ध केले पाहिजे.1 ट्रायने म्हटले आहे की, असे केले जाऊ शकते. कारण कंपन्यांना ताबडतोब स्पेक्ट्रम उपलब्ध करून द्यायचे नाही. बिहार, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश या तीन सर्कलमध्ये २,१०० मेगाहर्टझ् बँडच्या स्पेक्ट्रमही लिलाव व्हायला हवा जो याआधी एस-टेलसाठी राखून ठेवण्यात आला होता, अशीही सूचना नियामकने केली आहे. 2 टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१२ मध्ये १२२ परवाने रद्द केल्यानंतर एस-टेलने आपले कामकाज थांबविले होते. २०१० मध्ये थ्रीजी स्पेक्ट्रमसाठी जे किमान मूल्य निश्चित करण्यात आले होते तेच २००८ मध्ये टूजी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे सरकारचे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान करणारे ठरले, असा ‘कॅग’ ने ठपका ठेवला होता.